Ad will apear here
Next
पुणेकर धावले संविधानासाठी आणि समतेच्या न्यायासाठी
भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान जागर सप्ताहात 'संविधान दौड'


पुणे : ‘एक धाव समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्वासाठी...एक धाव आपल्या संविधानासाठी’ असा उद्घोष करत पुणेकर २५ नोव्हेंबरला सकाळी संविधानाच्या सन्मानासाठी धावले. निमित्त होते, भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान सन्मान समितीतर्फे संविधान जागर सप्ताहाअंतर्गत आयोजित संविधान दौडचे. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील आंबडेकर पुतळ्यापासून सणस मैदानापर्यंत ही दौड झाली.

सकाळी सात वाजता महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र सचिव व संविधान दौडचे मुख्य संयोजक बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, नगरसेविका सुनीता वाडेकर, शहराध्यक्ष अशोक कांबळे, महेश शिंदे, नीलेश आल्हाट, विठ्ठल गायकवाड, शाम गायकवाड, बसवराज गायकवाड, बाबुराव घाडगे, संदीप धांडोरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते या संविधान दौडचे आंबेडकर पुतळ्याजवळ उद्घाटन झाले. सणस मैदानावर या दौडची सांगता झाली.



महाराष्ट्र अॅथलेटिक संघाचे अध्यक्ष अभय छाजेड यांच्या हस्ते दौडमधील सहभागी स्पर्धकांना गौरविण्यात आले. त्यामध्ये पुरुष गटात रविकुमार महतो, स्वामीनाथ आसवले, अब्दुल कुरैशी, प्रेम कांबळे, शब्बीर मंसूरी, दीपक शुक्ला, मोबिन शेख, सुदेश कदम, अशोक जाधव, रतन बोदरे, अक्षय कांबळे, भूषण बांगरे, स्वस्तिक कसबे, अजय ठाकूर, बबन वाघचौरे यांना, महिला गटात रसिका पवार, प्रतीक्षा खरात, रईसा चम्बूर, सोनाली कोकाटे, श्रद्धा मांजरे यांना, तर अपंग गटात बबन बोराडे यांना सन्मानित करण्यात आले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZMQBU
Similar Posts
‘प्रसारमाध्यमांनी लोकशाही मूल्ये जपणारी भूमिका मांडावी’ पुणे : ‘प्रसारमाध्यमांकडे विचार स्वातंत्र्य आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणात त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असून, प्रसारमाध्यमांनी लोकशाही मूल्ये जपणारी भूमिका मांडायला हवी,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व संपादक अरुण खोरे यांनी केले. ‘माध्यमांचे व्यापारीकरण होत असताना मूल्ये जपणारी माध्यमे आपले वेगळेपण टिकवून असल्याचे त्यांनी नमूद केले
राज्यव्यापी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (आठवले गट) आयोजित राज्यव्यापी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. एसएसपीएमएसच्या मैदानावर होणाऱ्या या अधिवेशनासाठी भव्य मंडप उभारला जात असून, राज्यभरातून लाखो रिपब्लिकन कार्यकर्ते २७ मे २०१८ रोजी पुण्यात दाखल होत आहे. रविवारी सायंकाळी चार वाजता केंद्रीय राज्यमंत्री
पुणे येथे ‘वाचून मोठे होऊया’ उपक्रम पुणे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त ‘नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे होऊया’ हा संकल्प हाती घेण्यात आला असून, या संकल्पाअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीतर्फे १४ एप्रिलला डॉ. आंबेडकरांच्या जयंतीदिनी महापुरुषांच्या दहा हजार पुस्तकांचे मोफत वाटप
रामदास आठवले यांचे भालेराव यांच्याकडून स्वागत पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे पुणे विमानतळावर आगमन झाले. त्या वेळी त्यांचे स्वागत करताना वडगाव शेरी मतदारसंघाचे अध्यक्ष किरण भालेराव, विनोद टोपे, विक्रांत भोसले, शाम सदाफुले, विशाल साळवे, राम पाटी, शमशुद्दीन शेख, बाबू

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language